निवडणूक प्रचार यंत्रणा

तुम्ही उमेदवार असल्यास, वरीलप्रमाणे तुमच्या १०० किंवा अधिक कार्यकर्त्यांसाठी, प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या फोटो, नाव व माहितीसह संगणकाद्वारे दररोज किंवा गरजेनुसार पोस्ट पाठवण्यात येतील. या पोस्ट्स मध्ये गरजेनुसार तुमचा मोठा फोटो, नाव, निवडणूक चिन्ह इ. तसेच तुम्हाला सोयीचे असणारे सत्ताधारी अथवा विरोधक असाल त्यानुसार विविध मुद्दे असतील. या पोस्ट्सची प्रत्यक्षातील उदाहरणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यासाठी तुम्ही केवळ कार्यकर्त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला द्यायचे. हे कार्यकर्ते तुमच्या पक्षाचे व मित्र पक्षांचे पदाधिकारी, बुथप्रमुख किंवा अन्य कुणीही असू शकतात. आम्ही त्यांना ऑनलाईन नोंदणीची लिंक पाठवून त्यांची माहिती गोळा करू. त्यानंतर नोंदणी केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या पोस्ट्स इमेल आणि मोबाईलवर मिळणे सुरु होईल.

स्वतःचा फोटो, नाव आणि उत्तम दर्जाचं डिझाईन असल्याने कार्यकर्ते आवर्जून त्यांच्या सोशल मीडियावर या पोस्ट्स शेअर करतात.

या पद्धतीने तुमचा प्रचार मतदारसंघातल्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचतो, शिवाय सर्व कार्यकर्ते तुमच्याशी अधिक एकनिष्ठ होतात. तसेच विविध मुद्द्यांबद्दल कार्यकर्त्यांच्या ज्ञानात वाढ होऊन सोशल मीडियाच्या बाहेरही कार्यकर्ते प्रभावीपणे मुद्दे मांडू लागतात. कोणते कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत आणि कुणी करत नाहीत हे देखील विविध रिपोर्ट्स मधून दिसून येते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच प्रयत्न करता येतात.

मानसशास्त्रानुसार अश्या प्रकारच्या प्रचारातून तुमचे नाव, चेहरा, निवडणूक चिन्ह, तुमचे काम लोकांच्या सुप्त मनात कोरले जाऊन अधिक मतं मिळवण्यास मदत होते.

सोशल मीडियावर प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीत करता येते. त्यातून मोठी वातावरण निर्मिती घडून येते. त्याचे परिणाम मतपेटी / ईव्हीएम मध्ये उमटतात.

सोशल मीडिया प्रचारात होणाऱ्या चुका:

बदललेल्या सोशल मीडिया अल्गोरिथम मुळे तुम्हाला मिळणाऱ्या 'लाईक्स'ची संख्या घटली आहे. तुमच्या पोस्ट्स सोशल मीडियावर केवळ १ ते २ टक्के नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. जगातील कोणतीही सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी तुम्हाला महागड्या पेड कॅम्पेन शिवाय जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यावर पर्याय म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांचे ग्रुप बनवून पोस्ट फॉरवर्ड करायला लावल्या किंवा काही लोकं पगारी ठेऊन तुमची वॉर रूम सुरु केली तरी मानवी मेंदू तेच ते काम न थकता न चुकता करण्यासाठी बनला नसल्याने तुमच्या प्रचारात असंख्य त्रुटी राहतात. त्यामुळे वेळ, पैसा, श्रम वाया जातातच शिवाय एखाद्या चुकीमुळे तुमच्याच यंत्रणेतून तुमचा अपप्रचार देखील होऊ शकतो.

बहुतेक वेळा पक्ष आणि उमेदवारांच्या सध्याच्या टीम त्यांच्या स्थानाला धक्का लागण्याच्या किंवा रोजगार जाण्याच्या भीतीने योग्य ती माहिती व तंत्रज्ञानातील बारकावे तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाची फार मोठी यंत्रणा राबवत असल्याचा केवळ भ्रम निर्माण होतो परंतु लोकांपर्यंत प्रभावीपणे न पोचल्याने कामे केलेली असूनही किंवा योग्यता असूनही मतं न मिळण्यात याचे पर्यवसान होते.

जगतविख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात सोशल मीडिया आणि इमेल सारख्या टेक्नॉलॉजीज स्वतः बनवण्याचा अनुभव असणाऱ्या तज्ञांनी अनेक वर्षांच्या संशोधन आणि प्रयोगांतून निर्माण केलेल्या Polipics मध्ये तुम्हाला सर्वंकष, प्रभावी प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणा तथा तुमची संगणकाद्वारे चालवलेली व्हर्चुअल वॉर रूम मिळते. ज्यातून १००% अचूकतेने अथक, सूत्रबद्ध प्रचार शक्य होतो. मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवताना भारतीय समाज रचनेवर व इतर अनेक गोष्टींवर आधारित विविध गट संगणकाद्वारे तयार होऊन नेमका प्रचार नेमक्या लोकांपर्यंत, हवा त्या वेळी, वायुवेगाने पोहोचवता येतो.

सोशल मीडिया पेड मार्केटिंगच्या तुलनेत ९०% हून अधिक बचत Polipics मधून होऊ शकते. प्रचार यंत्रणेचा विशेष सवलतीचा दर जाणून घेण्यासाठी कृपया आम्हाला संपर्क करा.

यंत्रणा सर्व पक्षांच्या उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांसाठी खुली आहे. अनेक पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून मागणी वाढत असल्याने एका मतदारसंघात केवळ एकाच उमेदवारासाठी, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार भारतातील सर्वात अत्याधुनिक सोशल मीडिया प्रचार यंत्रणा Polipics राबवण्यात येते.

तुम्हाला Polipics प्रचार यंत्रणा हवी असल्यास, तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या आधी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.

तुमच्या गरजेनुसार - एकाच मतदारसंघात किंवा संपूर्ण राज्य अथवा देशात तुमचे, तुमच्या खात्याचे अथवा पक्षाचे कार्य पोहोचविणे, निवडणूक प्रचार इ. साठी Polipics प्रचार यंत्रणा उपयुक्त आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीमध्ये राबवलेल्या Polipics प्रचार यंत्रणेचा अहवाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Polipics हा प्रकल्प तंत्रज्ञान व ब्रँडिंग क्षेत्रांतल्या जागतिक पटलावरील काही सर्वोत्तम संशोधकांद्वारे चालवला जातो. हे संशोधक “ई-लर्निंग” पासून “ई-कॉमर्स” पर्यंत तसेच “ईमेल ला पर्याय ठरू शकणाऱ्या अधिक प्रगत ईमेल टेक्नॉलॉजी” पासून “शेतकऱ्यांचं कर्जावरचं अवलंबित्व संपवू शकेल अश्या टेक्नॉलॉजी” पर्यंत अनेकाविध प्रकल्पांचे जनक आहेत. या प्रकल्पांचा उपयोग आजवर जगभरातल्या कोट्यावधी लोकांना झालाय आणि त्यातून काही वर्ल्ड रेकॉर्ड्सही स्थापित झालेत. Polipics च्या तंत्रज्ञानाचं पेटंट घेण्यात येत असल्यामुळे या स्वरुपाचं सोशल मीडिया प्रचाराचं हे जगभरातील एकमेव तंत्रज्ञान असणार आहे.

काही व्यक्ती आणि संस्था वरवर पॉलिपिक्स शी साधर्म्य असलेले परंतु निकृष्ट दर्जाचे ॲप्स किंवा तंत्रज्ञान बाजारात आणण्याचा व विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सर्व ग्राहकांना विनंती आहे कि पॉलिपिक्स च्या अधिकृत ईमेल किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क करून संबंधित व्यक्ती किंवा संस्था पॉलिपिक्स चे अधिकृत प्रतिनिधी असल्याची खात्री करूनच पुढील व्यवहार करावा.
पॉलिपिक्स आणि संबंधित तंत्रज्ञान तसेच या वेबसाईट वरील माहिती संपूर्णपणे ही वेबसाईट चालवणाऱ्या संस्थेच्या मालकीची असून; कोणीही बौद्धिक संपदा हक्क, कॉपीराईट, पेटंट इ स्वरूपांच्या कायद्यांचे उल्लंघन करू नये. बेकायदेशीर आणि निकृष्ट तंत्रज्ञान बनवण्यात वेळ घालवण्याऐवजी पॉलिपिक्स चे अधिकृत भागीदार बनून आपण आपल्या ग्राहकांना ही जागतिक दर्जाची सेवा देऊ शकता. त्याकरिता या वेबसाईट वर दिलेल्या संपर्क क्रमांक किंवा ईमेल वर संपर्क साधावा.