• Polipics For
  Political Campaigning
 • Polipics For
  Corporate Campaigning
 • General Elections 2019
  1 Constituency
  Case Study
  4.11Cr
  Impressions in 1 Month
  ₹ 1.23Cr
  Worth Visibility

About Polipics

Polipics is an innovative mass-personalized campaigning method & technology (Patent Pending), developed by some of the best innovators in the domains of Technology and Branding, after 8 years of research including 3 years of implementation experiments in various sectors.

Polipics helps Political Parties, Political Leaders or Candidates, Governments, Corporate Companies or Brands gather mass support in a short span of time. Polipics does this through its unique social media campaigning method & technology.

Typically, Polipics saves more than 99% cost compared to paid social media campaigning. Additionally it offers various advantages over any existing digital campaigning method.

Polipics guarantees 100% accuracy of deliverables.

POLIPICS IMPACT

1 PC Lok Sabha 2019, BJP

0

Impressions in 1 Month

0

Worth Visibility

0

Votes
ENGLISH मराठी

राजकीय प्रचार

तज्ञांच्या मते मतदार "Entertainment आणि Election" किंवा "मनोरंजन आणि मतदान" यामध्ये फरक करू लागलेत. परिणामस्वरूप, मोकळ्या खुर्च्यांपुढे भाषणं केलेल्या नेत्यांना बहुमत आणि ज्यांच्या सभेत पाय ठेवायला जागा नाही त्यांना हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा मिळाल्याचं आपण पाहत आहोत. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या निरपेक्ष बातम्यांऎवजी संपादकांची मतं मांडण्याचं माध्यम झाल्याचं लक्षात आल्याने ही देखील माध्यमं पाहून मतदार त्यांची मतं आता ठरवत नाहीत. मुळात नवीन पिढ्या स्मार्टफोनमध्ये जगत असल्याने प्रचार सभा किंवा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. अश्या वेळी समाजाद्वारे समाजासाठी चालवलेलं माध्यम, म्हणजेच सोशल मीडिया, समाजाचं नुसतं मतपरिवर्तन नव्हे तर मनपरिवर्तन करण्यात अधिकाधिक सक्षम ठरतंय.

त्यामुळेच निवडणूक ग्रामपंचायतीची असो की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची, सोशल मीडिया प्रभावी ठरल्याचं जगभरात वेळोवेळी सिद्ध झालंय. जो कुणी ज्याही क्षेत्रात या माध्यमाचा “सर्वोत्तम” वापर करेल त्याचा जनमानसावर प्रभाव वाढणार हे निश्चित.

बदललेल्या सोशल मीडिया अल्गोरिथम आणि युजर बिहेविअरच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वच राजकीय पक्ष सध्या वापरत असलेल्या सोशल मीडियाच्या पद्धती बऱ्यापैकी कालबाह्य झाल्यात. पक्षांच्या सोशल मीडिया सेल किंवा कार्यकर्त्यांच्या हाताशी Polipics चं तंत्रज्ञान असणं हे सैन्याला अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्याइतकच गरजेचं असल्याचं सिद्ध झालंय. कारण अशा अत्याधुनिक मदतीशिवाय स्वतःहून सोशल मीडियाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा उत्तम विचारवंत, लेखक, डिझायनर, तंत्रज्ञ, रणनीतीकार आणि काही अंशी यंत्रमानव सुद्धा असावा लागेल..!

संपूर्ण प्रचारच बाहेरच्या मार्केटिंग कंपनीला आउटसोर्स करणे एखाद दुसरी निवडणूक जिंकून देऊ शकेलही, परंतु त्यामध्ये जनमानसाशी नाळ तुटण्याचा धोका संभवतो. म्हणूनच स्वतःचे नेते आणि कार्यकर्त्यांना Polipics च्या माध्यमातून सोशल मीडिया व अन्य प्रचारासाठी सक्षम करणे हा दीर्घ कालासाठी योग्य पर्याय ठरतो.

Polipics च्या माध्यमातून विविध मुद्दे कार्यकर्त्यांच्या नाव आणि फोटो सह जागतिक दर्जाच्या डिझाईन केलेल्या पोस्ट्सच्या स्वरुपात यंत्रणेतील सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळी संगणकाद्वारे पाठवण्यात येतात. पुढे कार्यकर्ते या रेडीमेड पोस्ट्स स्वतःच्या सोशल मीडिया (जसे की फेसबुक किंवा WhatsApp इ.) वर सहजपणे टाकतात. या पोस्ट्सची काही उदाहरणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा. त्यातून ते मुद्दे सर्वाधिक प्रभावीपणे, फारसं ट्रोलिंग न होता शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचतात. त्याही पलीकडे जाऊन वैयक्तिकरण आणि स्थानिकीकरणाच्या काही विशेष क्षमता Polipics मध्ये विकसित करण्यात आल्या आहेत. त्यातून हव्या त्या भागात किंवा मतदारसंघात अगदी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे हवी तशी वातावरणनिर्मिती करता येते.

याचं छोटसं उदाहरण पाहण्यासाठी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील बारामती लोकसभा मतदारसंघात राबवण्यात आलेल्या Polipics यंत्रणेचा अहवाल येथे क्लिक करून पाहता येईल.

Polipics च्या उपयोगाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यामागे कार्यकर्त्यांना बळ देण्याचा सुद्धा उद्देश आहे. त्यातून प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याची प्रतिमा सोशल मीडियावर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस बनते. मानसशास्त्रानुसार, या पद्धतीने प्रचार केल्यास कार्यकर्त्याचा तसेच उमेदवाराचा चेहरा आणि नाव लोकांच्या सुप्त मनात हळूहळू नकळत कोरले जातात. त्यामुळे उमेदवाराला अनपेक्षितपणे जास्त मतं मिळतात.

सोशल मीडिया प्रचारात होणाऱ्या चुका:

बदललेल्या सोशल मीडिया अल्गोरिथम मुळे तुम्हाला मिळणाऱ्या 'लाईक्स'ची संख्या घटली आहे. तुमच्या पोस्ट्स सोशल मीडियावर केवळ १ ते २ टक्के नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. जगातील कोणतीही सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी तुम्हाला महागड्या पेड कॅम्पेन शिवाय जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यावर पर्याय म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांचे ग्रुप बनवून पोस्ट फॉरवर्ड करायला लावल्या किंवा काही लोकं पगारी ठेऊन तुमची वॉर रूम सुरु केली तरी मानवी मेंदू तेच ते काम न थकता न चुकता करण्यासाठी बनला नसल्याने तुमच्या प्रचारात असंख्य त्रुटी राहतात. त्यामुळे वेळ, पैसा, श्रम वाया जातातच शिवाय एखाद्या चुकीमुळे तुमच्याच यंत्रणेतून तुमचा अपप्रचार देखील होऊ शकतो.

बहुतेक वेळा पक्ष आणि उमेदवारांच्या सध्याच्या टीम त्यांच्या स्थानाला धक्का लागण्याच्या किंवा रोजगार जाण्याच्या भीतीने योग्य ती माहिती व तंत्रज्ञानातील बारकावे तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाची फार मोठी यंत्रणा राबवत असल्याचा केवळ भ्रम निर्माण होतो परंतु लोकांपर्यंत प्रभावीपणे न पोचल्याने कामे केलेली असूनही किंवा योग्यता असूनही मतं न मिळण्यात याचे पर्यवसान होते.

जगतविख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात सोशल मीडिया आणि इमेल सारख्या टेक्नॉलॉजीज स्वतः बनवण्याचा अनुभव असणाऱ्या तज्ञांनी अनेक वर्षांच्या संशोधन आणि प्रयोगांतून निर्माण केलेल्या Polipics मध्ये तुम्हाला सर्वंकष, प्रभावी प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणा तथा तुमची संगणकाद्वारे चालवलेली व्हर्चुअल वॉर रूम मिळते. ज्यातून १००% अचूकतेने अथक, सूत्रबद्ध प्रचार शक्य होतो. मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवताना भारतीय समाज रचनेवर व इतर अनेक गोष्टींवर आधारित विविध गट संगणकाद्वारे तयार होऊन नेमका प्रचार नेमक्या लोकांपर्यंत, हवा त्या वेळी, वायुवेगाने पोहोचवता येतो.

Polipics हा प्रकल्प तंत्रज्ञान व ब्रँडिंग क्षेत्रांतल्या जागतिक पटलावरील काही सर्वोत्तम संशोधकांद्वारे चालवला जातो. हे संशोधक “ई-लर्निंग” पासून “ई-कॉमर्स” पर्यंत तसेच “ईमेल ला पर्याय ठरू शकणाऱ्या अधिक प्रगत ईमेल टेक्नॉलॉजी” पासून “शेतकऱ्यांचं कर्जावरचं अवलंबित्व संपवू शकेल अश्या टेक्नॉलॉजी” पर्यंत अनेकाविध प्रकल्पांचे जनक आहेत. या प्रकल्पांचा उपयोग आजवर जगभरातल्या कोट्यावधी लोकांना झालाय आणि त्यातून काही वर्ल्ड रेकॉर्ड्सही स्थापित झालेत. Polipics च्या तंत्रज्ञानाचं पेटंट घेण्यात येत असल्यामुळे या स्वरुपाचं सोशल मीडिया प्रचाराचं हे जगभरातील एकमेव तंत्रज्ञान असणार आहे.

तुम्हाला Polipics प्रचार यंत्रणा हवी असल्यास आमच्याशी थेट संपर्क करू शकता .

Polipics च्या माध्यमातून तुम्ही तसेच तुमचे कार्यकर्ते, नेते, उमेदवार व पक्ष यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत वेगाने पोहोचो या सदिच्छेसह,

आपले नम्र,
Team Polipics

महत्वाच्या लिंक्स:
लोकसभा प्रचार अहवाल २०१९

राजकीय प्रचार यंत्रणा

CORPORATE CAMPAIGNING

Is your brand still doing social media marketing through its official Facebook page?
If you have noticed lately the organic reach of your brand’s Facebook business page has dropped significantly and it may soon drop to 0. As a result - even if you have 1 million fans on Facebook, the posts are actually getting just a few likes.

Can there be a smart solution to this (instead of costly paid advertisement)?
Yes

Have you ever thought of utilizing the strength of your Channel Partner network to market on social media?
Co-branded (or joint) marketing is an age-old successful marketing strategy, widely used offline. Doing the same digitally can be effective with social media and similar channels. It makes perfect sense for brands to provide co-branded digital advertisement material to their agents / channel partners / retailers.

Polipics with its unique method & technology (Patent Pending) of mass-personalized digital campaigning creates and distributes personalized artworks (designed by our branding experts) to all your channel partners, with 100% accurancy. Further your channel partners simply publish these readymade advertisement artworks on their social media and other platforms.

Scientifically this works at 2 levels:
 1. Your channel partners are constantly reminded and educated of your products / services, hence their subconscious mind makes them recommend your brand to the end customer.
 2. When all channel partners publish the advertisment post on their social media on the same day, it creates huge impact through tens, hundreds, thousands of chaneel partner pages.

Pricing:
Polipics can save 99% of your cost compaired to social media paid advertisements. Contact us for details.

ENGLISH मराठी

पॉलिपिक्सच्या अन्य सेवा

 • वैयक्तिक वापरासाठी फोटो व नावासह सण-जयंतीच्या पोस्ट (मराठी)
  नोंदणी साठी लिंक http://polipics.in/r/a
 • व्यवसायासाठी लोगो व नावासह सण-जयंतीच्या पोस्ट (इंग्रजी)
  नोंदणी साठी लिंक http://polipics.in/r/b
 • एल.आय.सी. एजंट साठी नाव व संपर्कासह पॉलिसी जाहिरातींच्या पोस्ट (इंग्रजी व हिंदी)
  नोंदणी साठी लिंक http://polipics.in/r/lic
 • ग्रामपंचायत, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा, सहकारी संस्था इ. कोणत्याही निवडणुकीसाठी आधुनिक प्रचार यंत्रणा (सर्व भाषा)
  अधिक माहिती साठी लिंक http://polipics.in/mh.html
 • राजकीय प्रसिद्धी यंत्रणा (सर्व भाषा)
  अधिक माहिती साठी लिंक http://polipics.in/about/pr.html

तुम्ही इतरांना पॉलिपिक्स सेवा विकून आकर्षक आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. उदाहरणार्थ - पॉलिपिक्सची सेवा उपयोगी असेल अश्या ग्राहकांना याची माहिती देऊन त्यांची ऑनलाईन नोंदणी करून देण्याच्या बदल्यात "पॉलिपिक्स फी + तुमचे कमिशन" तुम्ही ग्राहकांकडून घेऊ शकता.
काही शंका असल्यास अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

काही व्यक्ती आणि संस्था पॉलिपिक्स शी साधर्म्य असलेले परंतु निकृष्ट दर्जाचे ॲप्स किंवा तंत्रज्ञान बाजारात आणण्याचा व विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सर्व ग्राहकांना विनंती आहे कि पॉलिपिक्स च्या अधिकृत ईमेल किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क करून संबंधित व्यक्ती किंवा संस्था पॉलिपिक्स चे अधिकृत प्रतिनिधी असल्याची खात्री करूनच पुढील व्यवहार करावा.
पॉलिपिक्स आणि संबंधित तंत्रज्ञान तसेच या वेबसाईट वरील माहिती संपूर्णपणे ही वेबसाईट चालवणाऱ्या संस्थेच्या मालकीची असून; कोणीही बौद्धिक संपदा हक्क, कॉपीराईट, पेटंट इ स्वरूपांच्या कायद्यांचे उल्लंघन करू नये. बेकायदेशीर आणि निकृष्ट तंत्रज्ञान बनवण्यात वेळ घालवण्याऐवजी पॉलिपिक्स चे अधिकृत भागीदार बनून आपण आपल्या ग्राहकांना ही जागतिक दर्जाची सेवा देऊ शकता. त्याकरिता या वेबसाईट वर दिलेल्या संपर्क क्रमांक किंवा ईमेल वर संपर्क साधावा.